चौकटीबाहेरचं प्रशासकीय जग
Gauri Kanetkar shared this
युनीक फीचर्सवरील परीक्षण
‘समाजमनातील बिंब’ हे लीना मेहेंदळे लिखित पुस्तक त्यांच्या प्रशासकीय जीवनाचा आढावा घेणारा उद्बोधक लेखसंग्रह आहे. भारतीय प्रशासनसेवेत असताना त्यांनी वेगवेगळ्या पदांवर राहून केलेल्या कामाचा, त्यातील अनुभवांचा सामान्य नागरिकाच्या नजरेतून करून दिलेला हा परिचय आहे. प्रशासन चालवताना सामान्य माणसाचा विचार आधी असावा, तसंच सशक्त व जिवंत समाजासाठी प्रशासनानं गतिमान व प्रगतिशील असायला हवं, आणि त्यासाठी गरज भासल्यास चौकट मोडून काम करायला पाहिजे, अशी मेहेंदळे यांची भूमिका आहे. असे चौकटीबाहेरचे प्रयोग जिथे दिसले त्यांची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, राजभाषा, दुष्काळ, पाणी-पर्यावरण समस्या, बेरोजगारी याविषयीचे स्वानुभव मेहेंदळे यांनी मांडले आहेत. याशिवाय परीक्षा पद्धती, निवडणुकीत नापसंतीचं मत देणं, प्रशासकीय भ्रष्टाचार याविषयीची व्यवहार्य मतंही त्यांनी मांडली आहेत. एका प्रशासकीय अधिकार्यािच्या स्वानुभवांचं हे पुस्तक प्रशासकीय कामकाजाची माहिती व त्यातील गुंतागुंत समजण्यास उपयुक्त आहे.
समाजमनातील बिंब/ लीना मेहेंदळे/मौज प्रकाशन गृह/पृष्ठे: १२७ /किंमत: १६० रुपये
Friday, October 7, 2011
रसिक साहित्यकडे विक्रीला आहेत
रसिक साहित्यकडे विक्रीला आहेत
समाजमनातील बिंब
एक शहर मेले त्याची गोष्ट
इथे विचारांना वाव आहे
नित्य लीला
लोकशाही ऐंशी प्रश्न आणि उत्तरे
सोनं देणारे पक्षी
समाजमनातील बिंब
एक शहर मेले त्याची गोष्ट
इथे विचारांना वाव आहे
नित्य लीला
लोकशाही ऐंशी प्रश्न आणि उत्तरे
सोनं देणारे पक्षी
Subscribe to:
Posts (Atom)